25 November 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार

PSU Stocks

PSU Stocks | इंडियन ऑइल या तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या महारत्न कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. मंगळवारी इंडियन ऑइल कंपनीने आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस इंडियन ऑइल स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. ( इंडियन ऑइल कंपनी अंश )

मागील एका वर्षात इंडियन ऑइल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी इंडियन ऑइल स्टॉक 1.44 टक्के घसरणीसह 170.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नोमुरा फर्मने इंडियन ऑइल स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 195 रुपये किमतीवर जाऊ शकतात. मार्च तिमाहीत इंडियन ऑइल कंपनीच्या इन्व्हेंटरी लॉस आणि कमकुवत रिफायनिंग मार्जिनमुळे कमाईवर मजबूत दबाव निर्माण झाला होता. सिटी फर्मने इंडियन ऑइल कंपनीचे शेअर्स 205 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

जेपी मॉर्गन फर्मने इंडियन ऑइल कंपनीच्या स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. मॉर्गन स्टॅन्ले फर्मने इंडियन ऑइल स्टॉक 191 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक 195 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तर अँटिक स्टॉक ब्रोकिंगने इंडियन ऑइल स्टॉकवर 204 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

मार्च 2024 तिमाहीत इंडियन ऑइल कंपनीचा नफा 4840 रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 8063 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तथापि कंपनीचे उत्पन्न मार्च तिमाहीत 1.98 लाख कोटी रुपये नोंदवले आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 1.99 लाख कोटी रुपये नोंदवले गेले होते. आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनीने अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. इंडियन ऑइल कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या शेअरवर 7 रुपये लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच गुंतवणुकदारांना एकूण 70 टक्के लाभांश मिळणार आहे.

गुरुवारच्या व्यवहारात इंडियन ऑइल स्टॉक 2.6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 168.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात इंडियन ऑइल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 80 टक्क्यांनी वाढली आहे. 2024 या वर्षात इंडियन ऑइल स्टॉक 35 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PSU Stocks India Oil Share Price NSE Live 03 May 2024.

हॅशटॅग्स

PSU Stocks(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x