21 November 2024 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक

REC Share Price

REC Share Price | आरईसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एका वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 लाखांपेक्षा जास्त झाले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरईसी स्टॉक 555.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( आरईसी कंपनी अंश )

आरईसी स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 127.40 रुपये होती. या कंपनीने नुकताच आपली मार्च तिमाहीची कामगिरी जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी आरईसी स्टॉक 0.70 टक्के वाढीसह 557.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आरईसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.44 लाख कोटी रुपये आहे. मार्च 2024 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 33 टक्के वाढ नोंदवली गेली होती. आरईसी कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 5 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

मागील दोन दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 18.50 टक्के वाढली होती. 2024 या वर्षात आरईसी स्टॉक 30 टक्के मजबूत झाला आहे. मार्च 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 42.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आरईसी कंपनीने डिसेंबर तिमाहीत 56 कोटी रुपये खर्च नोंदवला होता. तर मार्च तिमाहीत कंपनीने 711.9 कोटी रुपये खर्चाला राईटबॅक केला आहे. त्यामुळे कंपनीच्या PAT मध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षी मार्च तिमाहीत आरईसी कंपनीने 10,254.63 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मार्च 2024 तिमाहीत कंपनीने 12,706.66 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

आरईसी कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक 25.4 टक्क्यांच्या वाढीसह 4,273 कोटी रुपये झाले होते. आरईसी ही कंपनी भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व्यवसाय करणारी महारत्न दर्जा प्राप्त कंपनी आहे. आरईसी कंपनी RBI मध्ये नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी, सार्वजनिक वित्तीय संस्था आणि इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | REC Share Price NSE Live 03 May 2024.

हॅशटॅग्स

REC share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x