22 April 2025 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट

BHEL Share Price

BHEL Share Price | मागील एका वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 318.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. नुकताच बीएचईएल कंपनीने HIMA मिडल ईस्ट FZE दुबई कंपनीसोबत रेल्वे सिग्नलिंग व्यवसायासाठी धोरणात्मक भागीदारी करार केला आहे. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 4.19 टक्के वाढीसह 304.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल स्टॉक 292.65 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. बीएचईएल कंपनी भारतीय रेल्वेला लोकोमोटिव्ह, EMU/MEMU साठी इलेक्ट्रिक, प्रोपल्शन सिस्टम, ट्रॅक्शन मोटर्स, ट्रॅक्शन अल्टरनेटर, ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मर इत्यादींचा पुरवठा करण्याचे काम देखील करते. बीएचईएल कंपनी अडवजड उद्योगासाठी लागणारी जड उपकरणे बनवण्याचा ही व्यवसाय करते.

मागील एका वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 258 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के वाढली आहे. मागील तीन महिन्यांत बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 33 टक्क्यांनी वाढवले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 142 टक्के नफा कमावून दिला आहे.

2024 या वर्षात बीएचईएल स्टॉक 57 टक्क्यांनी वाढला आहे. जर तुम्ही एक वर्षापूर्वी बीएचईएल स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य तिप्पट म्हणजेच 357,635 रुपये झाले असते. एका वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर 86.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 311 रुपये किमतीवर पोहचला आहे.

बीएचईएल कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा 63.2 टक्के आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांचा वाटा 12.14 टक्के आहे. म्युच्युअल फंडानी या कंपनीचे 5.07 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-2024 या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसुल संकलनात 10.61 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

कंपनीने याकाळात 23,853.57 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये बीएचईएल कंपनीने 7.03 टक्के वाढीसह 477.39 कोटी निव्वळ नफा कमावला आहे. बीएचईएल कंपनीचे कर्ज-इक्विटी गुणोत्तर 0.2 आहे. तर शेअरचे किंमत ते कमाईचे गुणोत्तर -909.33 आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 04 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या