26 April 2025 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC HUDCO Share Price | सरकारी कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, पुढे मिळेल मोठा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO AWL Share Price | अदानी वील्मर शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: AWL HAL Share Price | मंदीत संधी, हा डिफेन्स कंपनीचा शेअर खरेदी करा, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: HAL BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते
x

PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी

PSU Stocks

PSU Stocks | कोल इंडिया या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक ब्रोकरेज हाऊसेस कोल इंडिया स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. ( कोल इंडिया कंपनी अंश )

शेअर बाजारातील तज्ञांनी कोल इंडिया स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मागील एका वर्षात कोल इंडिया स्टॉक दुप्पट वाढला आहे. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी कोल इंडिया स्टॉक 4.76 टक्के वाढीसह 475.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

ब्रोकरेज फर्म नुवामाने कोल इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 537 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. 2 मे 2024 रोजी कोल इंडिया कंपनीचे शेअर्स 454 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 18 टक्के नफा सहज मिळू शकतो.

जेफरीज फर्मने कोल इंडिया स्टॉकवर 520 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट आणि निव्वळ नफा अनुक्रमे 21 टक्के आणि 26 टक्के वाढला आहे. CLSA फर्मने कोल इंडिया स्टॉकवर 480 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तर मॅक्वेरी फर्मने या कंपनीच्या शेअरवर 465 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

मार्च तिमाहीत कोल इंडिया या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचा निव्वळ नफा 26 टक्क्यांनी वाढून 8640 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीचे मार्जिन 24.5 टक्केवरून 30.3 टक्के वाढले आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कोल इंडिया कंपनीचा EBITDA 21.5 टक्के वाढीसह 11338 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वार्षिक आधारावर 24.5 टक्केवरून वाढून 30.3 टक्के नोंदवले गेले आहे. कोल इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणूकदारांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 50 टक्के म्हणजेच प्रति शेअर 5 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीने शेअरधारकांना 5.25 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला होता.

मागील एका वर्षात कोल इंडिया स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यापेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्क्यांनी वाढली आहे. 2024 या वर्षात कोल इंडिया स्टॉक 25 टक्के वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 7 टक्के आणि एका आठवड्यात 5 टक्के वाढले आहेत. कोल इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 487.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 223 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.39 लाख कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PSU Stocks Coal India Share Price NSE Live 04 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

PSU Stocks(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या