22 November 2024 7:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार

Motorola Edge 50 Ultra

Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाच्या भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच आपला नवा स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. मोटोरोला Edge 50 Ultra असे या आगामी फोनचे नाव आहे. हा फोन याआधीही बाहेरील अनेक देशांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

आता टेक आउटलुकने हा फोन बीआयएस म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर पाहिला आहे. असे मानले जात आहे की फोनच्या लाँचिंगची तारीख दूर नाही. लिस्टिंगनुसार या फोनचा मॉडेल नंबर XT2401-1 आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 125W फास्ट चार्जिंग सारखे अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनी या फोनमध्ये 1220×2712 पिक्सल रिझोल्यूशनअसलेला 6.7 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 144Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याची पीक ब्राइटनेस लेव्हल 2500 निट्स आहे. फोनमध्ये 16 जीबी पर्यंत LPDDR5x रॅम आणि 1 टीबीपर्यंत UFS 4.0 स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 ऑफर करत आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत.

यामध्ये 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा मेन लेन्स आणि 64 मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर चा समावेश आहे. फोनचा मुख्य कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरसोबत येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनी 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. मोटोरोलाचा हा फोन 4500mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

ही बॅटरी 125 वॅटवायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये तुम्हाला 50 वॅट वायरलेस चार्जिंगचा ही सपोर्ट मिळेल. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी कंपनी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देत आहे. हा फोन IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स रेटिंगसह येतो. ओएसबद्दल बोलायचे झाले तर फोन अँड्रॉइड 14 वर आधारित Hello UI वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल 5G, 4G, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.4 आणि यूएसबी टाइप-C पोर्ट सारखे पर्याय आहेत.

News Title : Motorola Edge 50 Ultra featuring 50MP Selfie Camera Price in India 05 May 2024.

हॅशटॅग्स

#Motorola Edge 50 Ultra(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x