22 November 2024 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 382 टक्के नफा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जीचे कंपनीचे शेअर्स 16 वर्षांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2008 मध्ये 459.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून स्टॉक तब्बल 91 टक्के खाली आला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.77 टक्क्यांच्या घसरणीसह 41.37 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.09 टक्के घसरणीसह 40.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 56,279 कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 8.15 रुपये होती. सध्या सुझलॉन एनर्जी स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 52.3 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये. सुझलॉन एनर्जी स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या तुलनेत खाली आणि 10 दिवस, 30 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या तुलनेत वर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सलग वाढीनंतर सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये 30 टक्क्यांची नफा वसुली पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते, सध्या गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी हा स्टॉक खरेदी करताना 38.50 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावला पाहिजे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, मागील सहा ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 41 रुपये ते 42.50 रुपये दरम्यान राहण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पुढील काही ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 42.50 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्के वाढली आहे. तर 2024 या वर्षात आतापर्यंत हा स्टॉक 8 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 382 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1623 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 06 May 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x