Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने SJVN लिमिटेड कंपनीसोबत एक मोठा करार केल्याची बातमी येत आहे. या कराराअंतर्गत टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनी 460 मेगावॅट क्षमतेचा स्थिर आणि डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रकल्प उभारणार आहे. आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.03 टक्के घसरणीसह 450.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
एफडीआरई प्लांट अखंड वीजपुरवठा करू शकतो. यामुळे वीज वितरण कंपन्यांना त्यांचे वीज खरेदी दायित्वे आणि ऊर्जा संचय दायित्वे पूर्ण करण्यास मदत होते. टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीने हा करार 460 MW FDRE ची रचना करण्यासाठी आणि सोलर व विंड बॅटरी स्टोरेज टेक्नॉलॉजीचा संयोग करून कमाल वीज उत्पादन करून वाढत्या मागणी दरम्यान कार्यक्षमतेने वीज पुरवठा करण्यासाठी केला आहे.
टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने माहिती दिली की, या प्लांटमधून वार्षिक 300 कोटी युनिट वीज निर्मिती केली जाईल. आणि त्यामुळे 220 कोटी किलो कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक दीपेश नंदा यांनी माहिती दिली की, SJVN लिमिटेड कंपनीसोबतची ही भागीदारी कंपनीला शाश्वत ऊर्जा उपायांचा अवलंब करून हरित ऊर्जा उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करेल.
मागील आठवड्यात शुक्रवारी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के घसरणीसह 454.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 5 मे 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 199.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात टाटा पॉवर स्टॉक 39 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 127 टक्के परतावा कमावून दिला आहे.
तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 490 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. दैनंदिन चार्टवर या स्टॉकमध्ये 474 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक या किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 490 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र मंदीच्या ट्रेण्डमध्ये हा स्टॉक 384 रुपये किमतीवर येऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Power Share Price NSE Live 06 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS