22 November 2024 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार?

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्यात या कंपनीचे शेअर्स 39.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आता हा अरॉक 30 रुपये किमतीच्या खाली आला आहे. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तालयाकडून कर मागणी नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटीसमध्ये कंपनीला केंद्रीय वस्तू सेवा कर अधिनियम, 2017 च्या कलम 73 (9) अंतर्गत 22,508 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 1.48 टक्के घसरणीसह 26.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आलोक इंडस्ट्रीज कंपनीने इनपुट टॅक्स रिटर्न रक्कमेच्या जादा मागणीचा दावा केल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे. आलोक इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनी या नोटीस विरोधात कायदेशीर अपील दाखल करणार आहे. तथापि या नोटीसमुळे कंपनीच्या कामकाजावर किंवा इतर कामांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही अशी माहिती कंपनीने दिली आहे.

मार्च 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत आलोक इंडस्ट्रीज कंपनीने आपला निव्वळ तोटा कमी केला आहे. मार्च 2023 तिमाहीत आलोक इंडस्ट्रीज कंपनीला 297.55 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 1570.48 कोटी रुपयेची विक्री नोंदवली होती, जी मार्च 2024 मध्ये 6.44 टक्के कमी होऊन 1469.31 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आलोक इंडस्ट्रीज कंपनीला 845.82 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. 2022-2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 880.45 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीने 21.17 टक्के घसरणीसह 5509.59 कोटी रुपये विक्री साध्य केली होती. मार्च 2024 तिमाहीत कंपनीच्या प्रवर्तकांनी आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण 1,98,65,33,333 शेअर्स म्हणजेच 40.01 टक्के भाग भांडवल आहे. तर जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे एकूण 1,73,73,11,844 शेअर्स म्हणेज 34.99 टक्के भाग भांडवल आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price NSE Live 06 May 2024.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x