22 November 2024 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु

Ashirwad Capital Share Price

Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 1.83 टक्के वाढीसह 5.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. ( आशीर्वाद कॅपिटल कंपनी अंश )

1 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.24 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.27 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी आशीर्वाद कॅपिटल स्टॉक 1.97 टक्के वाढीसह 5.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच आशीर्वाद कॅपिटल कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आशीर्वाद कॅपिटल कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 10/05/2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मार्च तिमाहीचे निकाल आणि मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याच्या प्रस्तावावर विचार करतील.

मार्च 2024 पर्यंत आशीर्वाद कॅपिटल कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 51 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 49 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीच्या प्रमुख प्रवर्तकांमध्ये शिल्पा पोद्दार, दिनेश पोद्दार सामील आहेत.

या दोघांनी कंपनीचे अनुक्रमे 10.27 टक्के आणि 16.40 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आशीर्वाद कॅपिटल ही नॉन-बँक फायनान्स कंपनी 1985 साली सुरू झाली होती. ही कंपनी स्टॉक मार्केट आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याचा व्यवसाय करते. आशीर्वाद कॅपिटल ही एक कर्जमुक्त कंपनी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashirwad Capital Share Price BSE Live 06 May 2024.

हॅशटॅग्स

Ashirwad Capital Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x