19 April 2025 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार?

Adani Port Share Price

Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने फिलीपिन्समध्ये आपला व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली आहे. ही कंपनी फिलिपिन्समध्ये बंदर विकास व्यावयाचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. अदानी पोर्ट्स कंपनीचे एमडी करण अदानी यांनी फिलिपाइन्सच्या अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीनंतर ही अपडेट जाहीर केली होती. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनी अंश )

फिलिपाइन्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात माहिती देण्यात आली आहे की, अदानी पोर्ट्स कंपनी फिलीपिन्समध्ये बंदर विकासासाठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी या देशात 25 मीटर खोलीचे बंदर बांधणार आहे. आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 2.36 टक्के घसरणीसह 1,289.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

फिलिपाईन्स देशाच्या राष्ट्रपतींनी अदानी पोर्ट कंपनीच्या व्यवसाय विस्तार योजनेबाबत उत्साह व्यक्त केला आहे. फिलिपाईन्सच्या राष्ट्रपतींनी आपल्या निवेदनात सुचवले आहे की, देशाच्या कृषी उत्पादनाच्या आयात आणि निर्यातीसाठी या बंदराचा फायदा घेता यावा आणि देशांच्या कृषी क्षमतांचा विकास साधण्यासाठी देखील या बंदराचा वापर झाला पाहिजे.

अदानी पोर्ट कंपनीची कार्गो ग्रोथ आर्थिक वर्ष 2025 मध्ये 10 ते 14 टक्क्यांनी वाढेल. कंपनीने आपल्या भांडवली खर्चात 10,500 कोटी ते 11,500 कोटी रुपये वाढ करण्याची योजना आखली आहे. यातील 7000 कोटी रुपये नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवले जाणार आहेत. अदानी पोर्ट कंपनीने श्रीलंकेतील बंदर 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मार्च तिमाहीत अदानी पोर्ट कंपनीची निव्वळ विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 19 टक्के वाढीसह 6896 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा नफा 76 टक्के वाढीसह 2039 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या EBITDA मध्ये 19 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. यासह कंपनीचा EBITDA 4347 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अदानी पोर्ट स्टॉकचा ईपीएस 5.36 टक्केवरून 9.44 टक्केपर्यंत वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE Live 06 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या