18 November 2024 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा?

JP Associates Share Price

JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या विविध कर्जबाजारी कंपन्यांच्या समस्या काही संपताना दिसत नाहीये. नुकताच जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी 4616 कोटी रुपये कर्ज वेळेवर परतफेड करण्यात अपयशी ठरली आहे. ( जयप्रकाश असोसिएट्स कंपनी अंश )

या कर्जाची परतफेड करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2024 होती. 4616 कोटी रुपये पैकी 1751 कोटी रुपये कर्ज होते, आणि त्यावर एकूण 2865 कोटी रुपये व्याज होते. आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक 0.57 टक्के वाढीसह 17.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जय प्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीला 2037 पर्यंत एकूण 29,805 कोटी रुपये व्याजासकट परतफेड करायचे आहे. त्यापैकी 30 एप्रिल 2024 पर्यंत 4616 कोटी रुपये कर्ज परतफेड करायचे होते. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या एकूण 29,805 कोटी रुपये कर्जापैकी 18,955 कोटी रुपये कर्ज SPV कडे हस्तांतरित करण्याची योजना कंपनीने आखली आहे. या निर्णयाला अद्याप एनसीएलटीने मान्यता दिलेली नाही.

जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही एक जबाबदार कर्जदार म्हणून आमच्या कर्जाची परतफेड करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. सिमेंट व्यवसायात निर्गुतवणूक करून जयप्रकाश असोसिएट्स कंपनी आपले कर्ज पूर्णपणे परतफेड करेल. या सर्व आर्थिक समस्यांबाबत जय प्रकाश असोसिएट्स न्यायालयातही लढा देत आहेत. ICICI बँकेने जयप्रकाश असोसिएट्स कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यासाठी NCLT अलाहाबादमध्ये याचिका दाखल केली होती.

4 जानेवारी 2008 रोजी जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 323 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक तब्बल 94 टक्क्यांनी घसरला आहे. मागील आठवड्यात मंगळवारी जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक 4 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. सध्या या कंपनीचे शेअर्स 6.92 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीपेक्षा 3 पट अधिक किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Associates Share Price NSE Live 08 May 2024.

हॅशटॅग्स

JP Associates Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x