21 November 2024 10:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल

South Indian Bank Share Price

South Indian Bank Share Price | साउथ इंडियन बँकेचे शेअर्स सध्या 30 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन वर्षांत साउथ इंडियन बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 290 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 मे 2022 रोजी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 30 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. ( साउथ इंडियन बँक कंपनी अंश )

2 फेब्रुवारी 2024 रोजी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 36.91 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 10 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 14.64 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 27.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, साउथ इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये 32-33 रुपये किमतीवर मजबूत ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. जर या स्टॉकने हा ब्रेकआउट ओलांडला तर शेअरमध्ये तुफानी रॅली पाहायला मिळू शकते. साउथ इंडियन बँकेचा स्टॉक आपल्या सर्व प्रमुख मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. अल्पावधीत या बँकेचे शेअर्स 34 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र गुंतवणूक करताना तज्ञांनी 24 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

2023-24 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत साउथ इंडियन बँकेने 13.88 टक्के वाढीसह 287.56 कोटी रुपये नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत साउथ इंडियन बँकेचा नफा 333.89 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मार्च 2014 तिमाहीत साउथ इंडियन बँकेचा एकूण खर्च वाढून 2,187 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

मागील वर्षी याच तिमाही कालावधीत बँकेचा खर्च 1,757 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मार्च 2014 तिमाहीत साउथ इंडियन बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 2,621 कोटी रुपये नोंदवले गेले होते. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत बँकेचे उत्पन्न 2.318 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | South Indian Bank Share Price NSE Live 08 May 2024.

हॅशटॅग्स

South Indian Bank Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x