18 November 2024 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारी 1.88 टक्के वाढीसह 23.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 66,281 कोटी रुपये आहे. 29 एप्रिल ते 7 मे दरम्यान येस बँकेचे शेअर्स 16 टक्के कमजोर झाले होते. ( येस बँक अंश )

9 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 32.81 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 23 ऑक्टोबर 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 14.10 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.44 टक्के घसरणीसह 22.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील तीन महिन्यांत येस बँकेचे शेअर्स 23.28 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील एका आठवड्यात येस बँकेचे शेअर्स 12 टक्के घसरले आहेत. या बँकिंग स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1.4 आहे, जो या कालावधीत खूप उच्च अस्थिरता दर्शवतो. येस बँकेचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवसांच्या मुवींग सरकारी किंमत पातळीच्या खाली आणि 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूवींग सरासरी किंमत पातळीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. येस बँक स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 37.4 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये 24.3 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 22.5 रुपये सपोर्ट किमतीच्या खाली आला तर शेअर 20.4 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एंजल ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक आपल्या 200 दिवसाच्या SMA च्या दिशेने वाटचाल करत आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 24-26 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळू शकतो.

मेहता इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये 23.30 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. स्टॉकच्या व्हॉल्यूममध्ये जोरदार वाढ पाहायला मिळाली आहे. कोटक फर्मच्या तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2025-26 साठी येस बँक स्टॉकचा EPS 13 पट राहण्याचा अंदाज आहे. स्टॉकचा इक्विटी ऑन रिटर्न प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

मार्च तिमाहीत येस बँकेने 123 टक्के वाढीसह 452 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत 202 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च तिमाहीत येस बँकेची सकल नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता 1.7 टक्के नोंदवली गेली आहे. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत बँकेचा NPA 2.2 टक्के नोंदवला गेला आहे. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचा निव्वळ NPA 0.6 टक्के नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 09 May 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x