24 November 2024 10:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL
x

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही : परराष्ट्र मंत्रालय

Donald Trump, President of India Donald Trump, USA President Donald Trump, Prime Minister of India Narendra Modi, PM Narendra Modi, NAMO, Pakistan, Jammu and Kashmir, Pakistan Prime minister Imran Khan

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या संकटाचा सामना करत असताना पंतप्रधान इम्रान खान यांना अमेरिकन सकारकडून मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र अमेरिकेतील ट्रम्प सरकार देखील पाकिस्तानवर दहशतवादी कारवाई रोखण्यात तिथल्या विद्यमान सरकारला अपयश येत असल्याच्या करणारे ट्रम्प सरकार इम्रान खान यांच्यावर प्रचंड नाराज आहे. परिणामी जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर आपल्या शिष्टमंडळासोबत गेले असता त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर कोणीही फिरकले नाहीत. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि शिष्टमंडळाला चक्क ट्रेनने प्रवास करावा लागला.

दरम्यान काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले. इतकंच नव्हे तर ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीर प्रश्नी चर्चा केल्याचा दावा केला आहे. तसेच नरेंद्र मोदींनी काश्मीरचा वाद निवळण्यासाठी मदत करावी असेही मला सांगितले होते. त्यावेळी मी मध्यस्थीसाठी तयार असल्याचा मोदींना सांगितले होते, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प प्रशासनाच्या या दाव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि परिणामी मोदी सरकार पेचात पडल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला. “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत आणि पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करायला तयार आहेत, असं सांगण्यात आलं. मात्र, अशी कुठलीही विनंती पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलेली नाही. काश्मीर प्रश्नावर भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे”, असं ट्विट रवीश कुमार यांनी केलं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोटा ठरला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x