5 November 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 55 रुपये! स्वस्त शेअरला तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, स्टॉक तेजीत धावणार

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला महाराष्ट्रात 342.76 कोटी रुपये मूल्याचे भूजल उत्खनन प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. यासाठी कंपनीने सर्वात कमी बोली लावली होती. ( पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश )

पटेल इंजिनीअरिंग कंपनीला हे काम 24 महिन्यांच्या आत पूर्ण करायचे आहे. या संयुक्त उपक्रमात पटेल इंजिनीअरिंग कंपनीचा वाटा 35 टक्के आहे. आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी पटेल इंजिनीअरिंग स्टॉक 0.82 टक्के वाढीसह 55.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

पटेल इंजिनिअरिंग कंपनीने सेबीला माहिती दिली की, महाराष्ट्र सरकारच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाने कंपनीला 342.76 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट दिले आहे. या करारामध्ये कंपनीला जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील जलमग्न क्षेत्रासाठी पाणी रिकामी करण्याची यंत्रणा उभारायची आहे. याकामात सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल संबंधित कामांचाही समावेश आहे.

पटेल इंजिनीअरिंग ही मुंबईस्थित कंपनी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम, जलविद्युत प्रकल्प, धरण प्रकल्पांसाठी बोगदे आणि भूमिगत कामांमध्ये एक्स्पर्ट मानली जाते. गुरुवारी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 3.28 टक्के घसरणीसह 55.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्म आनंद राठीने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. तज्ञांच्या मते, पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 66 रुपयेपर्यंत वाढू शकतात. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 79 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मागील एका वर्षात पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 177 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 367 टक्के मजबूत झाले आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीचे 1.42 टक्के भाग भांडवल धारण केले होते. डिसेंबर 2023 तिमाहीत विजय केडिया यांनी 1.68 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price NSE Live 10 May 2024.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x