22 November 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला

Rattanindia Power Share Price

Rattanindia Power Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. दरम्यान कंपनीचे शेअर्स 10.76 रुपये किमतीवर पोहचले होते. फेब्रुवारी 2024 मध्ये रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स 12.29 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )

मागील वर्षी म्हणजे मे 2023 मध्ये रतन इंडिया पॉवर स्टॉक 3.03 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 2.19 टक्के वाढीसह 11.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील चार दिवसांत रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात रतन इंडिया पॉवर स्टॉक 234 टक्के मजबूत झाला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

तज्ञांच्या मते, रतन इंडिया पॉवर स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित वाटत आहे. मात्र गुंतवणूक करताना 9.20 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. हा स्टॉक अल्पावधीत 11.70 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. रतन इंडिया पॉवर कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 44.06 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 55.94 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. Ratan India Enterprises Limited कंपनीने प्रवर्तक गटात रतन इंडिया पॉवर कंपनीचे 19.81 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. RR इन्फ्रालँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्रवर्तक गटात 24.25 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattanindia Power Share Price NSE Live 10 May 2024.

हॅशटॅग्स

Rattanindia Power Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x