22 November 2024 5:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार

NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 353.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. एनटीपीसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.44 लाख कोटी रुपये आहे. ( एनटीपीसी कंपनी अंश )

आज या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, एनटीपीसी कंपनीची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीने नवीकरणीय एनर्जी पार्क आणि प्रकल्पांचे विकास कार्य करण्यासाठी महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 2.36 टक्के वाढीसह 354.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 357 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 101 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123 टक्के परतावा कमावून दिला आहे. एनटीपीसी कंपनीचे एकूण बाजार भांडाल 3.44 लाख कोटी रुपये आहे.

1 जून 2023 रोजी एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 171.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 380.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. एनटीपीसी स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 52.2 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये.

एनटीपीसी स्टॉकचा बीटा 0.9 आहे, जो एका वर्षात कमी अस्थिरता दर्शवतो. एनटीपीसी स्टॉक 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या वर आणि 5 दिवस, 10 दिवस आणि 20 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.

एनटीपीसी कंपनीने हरित ऊर्जा उद्दिष्टे आणि GOI च्या ऊर्जा संक्रमणाच्या दिशेने केलेले प्रयत्न साकार करण्यासाठी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेड यांनी 8 मे रोजी सामंजस्य करार केल्याची माहिती सेबीला कळवली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NTPC Share Price NSE Live 10 May 2024.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x