24 November 2024 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानंतर ब्रोकरेज फर्म HSBC ने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची रेटिंग ‘रिड्युस’ केली आहे. मार्च 2024 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 1046 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. यात वार्षिक 11 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

कंपनीच्या महसूल उत्पन्नात वाढ झाल्याने कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. 2022-23 च्या जानेवारी- मार्च तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 939 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.47 टक्के वाढीसह 415.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मार्च 2024 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 16,463.94 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 13,325.30 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. HSBC फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीची तिमाही कमाई अंदाजापेक्षा कमी आली आहे. मात्र इतर उत्पन्नामुळे नफ्यात वाढ झाली आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर स्टॉकची टारगेट किंमत 300 रुपये निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने देखील टाटा पॉवर स्टॉक पुढील 12 महिन्यांत 45 टक्के घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मागील सहा महिन्यांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 64 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स त्यांच्या वार्षिक अंदाजे कमाईच्या तुलनेत 35 टक्के अधिक किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील 21 तज्ञांपैकी 8 जणांनी टाटा पॉवर स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे. तर 3 जणांनी हा स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. आणि इतर 10 जणांनी स्टॉक तत्काळ ‘विक्री’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 20 टक्के खाली येऊ शकतो. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.31 लाख कोटी रुपये आहे.

टाटा पॉवर कंपनीने संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 4280 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी कंपनीने 3,810 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचे एकूण उत्पन्न 2022-23 मध्ये 56,547.10 कोटी रुपये होते, जे वाढून 63,272.32 कोटी रुपयेवर पोहचले आहे. टाटा पॉवर कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवर 2 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची शिफारस केली आहे. यासाठी कंपनीने 4 जुलै 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 11 May 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x