23 November 2024 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस?

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स अनेक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2200 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 1.35 टक्क्यांच्या वाढीसह 2,803.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )

मागील 10 ट्रेडिंग सेशनपासून अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 3285 रुपयेवरून घसरुन 2767 रुपये किमतीवर आला होता. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 0.61 टक्के वाढीसह 2,814.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अदानी एंटरप्रायझेस स्टॉकची 10 ट्रेडिंग सेशनपासूनची घसरण शुक्रवारी थांबली. आणि शेअर आपल्या डिसेंबर 2023 मधील 2760 रुपये या सपोर्ट लेव्हलच्या वर तग धरून राहण्यास यशस्वी ठरला. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2800 रुपये किमतीच्या वर क्लोज झाले होते. यावरून असे समजते की, सपोर्ट लेव्हलवर गुंतवणुकदार शेअरमध्ये जोरदार खरेदी करत आहेत. अदानी एंटरप्रायझेस स्टॉकमध्ये दैनंदिन टाइम फ्रेमवर 2760 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे.

दैनंदिन टाईम फ्रेमवर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 2800 रुपये ते 2900 रुपये दरम्यान कंसोलिडेट होऊ शकतो. त्यानंतर या स्टॉकमध्ये तीव्र चढउतार पाहायला मिळू शकतो. सततच्या घसरणीनंतर अदानी एंटरप्रायझेस स्टॉकमध्ये शॉर्ट पोझिशन तयार झाल्या आहेत, ज्या 2940 रुपये किमतीवर कव्हर केल्या जाऊ शकतात. हा स्टॉक शेअर बाजार सुधारताच 3100 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

मागील काही काळात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.53 टक्के घसरली आहे. मागील सहा महिन्यात अदानी एंटरप्रायझेस स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे 27 टक्के वाढवले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 10.58 टक्केची घसरण नोंदवली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 13 May 2024.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x