22 November 2024 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असला तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. इंडियन इमल्सीफायर कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. ( इंडियन इमल्सीफायर कंपनी अंश )

इंडियन इमल्सीफायर कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 125 रुपये ते 132 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 1000 शेअर्स ठेवले आहेत. त्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 132000 रुपये जमा करावे लागतील.

किरकोळ गुंतवणूकदार इंडियन इमल्सीफायर कंपनीच्या IPO मध्ये 13 मे ते 16 मे दरम्यान गुंतवणूक करू शकतात. 17 मे रोजी कंपनी गुंतवणुकदारांना शेअर्स वाटप करेल. 22 मे रोजी हा स्टॉक NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केला जाईल. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, इंडियन इमल्सीफायर IPO स्टॉक 200 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर 332 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. हा IPO सूचीबद्ध झाल्यावर पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 151 टक्के नफा मिळू शकतो.

इंडियन इमल्सीफायर कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 12 कोटी रुपये भांडवल जमा केले आहे. कंपनीने 10 मे रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी IPO खुला केला होता. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांच्या 50 टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी 16 जून 2024 पर्यंत निश्चित केला आहे. आणि उर्वरित शेअर्सचा लोकइन कालावधी 90 दिवसांचा ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ अँकर गुंतवणूकदार 30 दिवसांनंतर आपले अर्धे शेअर्स विकून पैसे काढू शकतात. आणि उर्वरित पैसे 90 दिवसाचा लॉक-इन कालावधी संपल्यावर काढता येतील.

इंडियन इमल्सीफायर कंपनीच्या IPO चा आकार 42.39 कोटी रुपये आहे. ही कंपनी आपल्या IPO मध्ये 31.11 लाख फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. या कंपनीने IPO मध्ये 35 टक्के वाटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे, आणि पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी कमाल 50 टक्के वाटा राखीव ठेवला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Indian Emulsifier Ltd 13 May 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(132)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x