22 November 2024 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक

Bisil Plast Share Price

Bisil Plast Share Price | बिसिल प्लास्ट कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 9.73 टक्के वाढीसह 2.82 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( बिसिल प्लास्ट कंपनी अंश )

18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.67 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ऑगस्ट 2023 मध्ये हा स्टॉक 1.43 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला होता. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी बिसिल प्लास्ट स्टॉक 9.93 टक्के वाढीसह 3.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बिसिल प्लास्ट लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 21 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी आपले 2023-24 या आर्थिक वर्षाचे आणि मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी बिसिल प्लास्ट कंपनीचे 99.96 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर प्रवर्तकांनी कंपनीचे 0.04 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

बिसिल प्लास्ट कंपनीची स्थापना 25 सप्टेंबर 1986 रोजी झाली होती. या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 1956 अंतर्गत रजिस्ट्रार ऑफ कंपनी, गुजरात यांनी केली होती. बिसिल प्लास्ट कंपनी 1992 साली पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतरित करण्यात आली. मागील एका महिन्यात बिसिल प्लास्ट कंपनीच्या पेनी स्टॉकची किंमत 47 टक्के वाढली आहे. तर मागील पाच दिवसात हा स्टॉक 32 टक्के मजबूत झाला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स 72,664.47 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22,055.20 अंकांवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bisil Plast Share Price NSE Live 13 May 2024.

हॅशटॅग्स

Bisil Plast Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x