23 November 2024 6:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकला या प्राईसवर पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा अलर्ट

Jio Financial Services Share Price

Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,16,901.12 कोटी रुपये आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 1.90 टक्क्यांच्या घसरणीसह 341.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 एप्रिल 2024 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 394.70 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. या किमतीवरून शेअर आता 13.50 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )

मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 2.86 टक्के वाढीसह 351.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जिओ फायनान्शिअल कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 310.63 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 293.82 कोटी रुपये नफा कमावला होता. तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात 5.72 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च 2024 तिमाहीत जिओ फायनान्शिअल कंपनीचा PAT 1,605 कोटी रुपये नोंदवला गेला होता. सध्या शेअर बाजारातील अनेक तज्ञ या स्टॉकबाबत ‘सकारात्मक’ भावना व्यक्त करत आहेत.

जिओ फायनान्शिअल कंपनीकडे सध्या 25 कोटी रिटेल ग्राहक आणि जिओ कंपनीकडे 44 कोटी दूरसंचार ग्राहक आहेत. ही कंपनी पुढील तीन ते पाच वर्षात आर्थिक सेवांमध्ये मोठी कंपनी म्हणून उदयास येऊ शकते. त्यामुळे शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी जिओ फायनान्शिअल स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 430 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

जिओ फायनान्शिअल कंपनीने जगातील सर्वात मोठी गुंतवणूक कंपनी BlackRock सोबत देखील भागीदारी करार केला आहे. जिओ फायनान्शिअल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी भारतामध्ये संपत्ती व्यवस्थापन आणि ब्रोकिंग व्यवसाय स्थापन करण्यासाठी BlackRock Inc आणि BlackRock Advisors Singapore Ltd सोबत 50:50 संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी करार केला आहे. मागील वर्षी या दोन्ही कंपन्यांनी मिळून भारतात मालमत्ता व्यवस्थापन उपक्रम सुरू केला आहे.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉक 336 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र 348 रुपये जवळ पुलबॅकचे संकेत मिळत आहेत. जर हा स्टॉक 358 रुपये या प्रतिकार पातळीच्या पार गेला तर शेअर 386 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉक 360 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांनी गुंतवणूकदारांना हा स्टॉक खरेदी करताना 320 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Services Share Price NSE Live 14 May 2024.

हॅशटॅग्स

#Jio Financial Services Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x