21 November 2024 8:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी

BEML Share Price

BEML Share Price | बीईएमएल लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त तेजीसह क्लोज झाले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. नुकताच या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 62.9 टक्क्यांची वाढ झाल्याने शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. ( बीईएमएल लिमिटेड कंपनी अंश )

बीईएमएल लिमिटेड ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करणारी कंपनी आहे. सोमवारी बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3352.85 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि अल्पावधीत हा स्टॉक 3666.60 रुपये या आपल्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला होता. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी बीईएमएल लिमिटेड स्टॉक 3.36 टक्के वाढीसह 3,800 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मार्च तिमाहीत बीईएमएल लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 256.80 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कंपनीचा महसूल 9 टक्क्यांच्या वाढीसह 1513.70 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. बीईएमएल लिमिटेड कंपनीचा EBITDA 29.2 टक्क्यांच्या वाढीसह 370.40 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या कंपनीने मार्च तिमाही निकालासोबत एका शेअरवर 15.5 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 155 टक्के लाभांश देणार आहे.

मागील एका वर्षात बीईएमएल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 165 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 6.8 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा 54 टक्के आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4139.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1,365 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEML Share Price NSE Live 14 May 2024.

हॅशटॅग्स

#BEML Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x