22 November 2024 7:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळानंतर जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 13.15 रुपये किमतीवर पोहचला होता. व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या शुल्कात वाढ करणार आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

तिमाही निकालापूर्वी अॅक्सिस कॅपिटल फर्मने आपल्या अहवालात म्हंटले होते की, सार्वत्रिक निवडणुकांनंतर सर्व टेलिकॉम ऑपरेटर्स आपले दर 25 टक्क्यांनी वाढवू शकतात. ब्रोकरेज फर्म सिटीनुसार व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत पुढील काही महिन्यांत दुप्पट होऊ शकते. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.75 टक्के वाढीसह 13.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीचा डिसेंबर तिमाहीत प्रति वापरकर्ता सरासरी महसूल म्हणजेच APRU 145 रुपये होता. जो सर्व प्रतिस्पध्यांच्या तुलनेत सर्वात कमी होता. भारती एअरटेल कंपनीचा APRU 208 रुपये आणि रिलायन्स जिओ कंपनीचा APRU 145 रुपये होता. BofA सिक्युरिटीज फर्मने या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या अहवालात म्हंटले होते की, व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या शुल्कात वाढ करू शकते.

जर व्होडाफोन आयडिया कंपनीने 5 टक्के एआरपीयू वाढवला तर कंपनीच्या प्रति शेअर कमाईमध्ये म्हणजेच EPS मध्ये 12 टक्के वाढ होऊ शकते. ही संभाव्य टॅरिफ वाढ लोकसभा निवडणुकीनंतर होणे अपेक्षित आहे. शुल्क वाढीव्यतिरिक्त व्होडाफोन आयडिया कंपनीला वाढीव ARPU चा फायदा 2G सबस्क्रिप्शन आणि 4G श्रेणीत सुधारणा करण्यासाठी होऊ शकतो.

व्होडाफोन आयडिया स्टॉक मागील एका वर्षात 90 टक्के वाढला आहे. या दूरसंचार कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना YTD आधारे 23 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. दीर्घ मुदतीत या कंपनीचे शेअर्स 89 टक्के कमजोर झाले आहेत. 2015 मध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 18.42 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.87 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 15 May 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x