23 November 2024 9:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली

GTL Share Price

GTL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 72980 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22177 अंकांवर ट्रेड करत होता. दरम्यान, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी वित्तीय निर्देशांकांमध्ये किंचित घसरण पहायला मिळाली होती. तर निफ्टी ऑटो, निफ्टी बँक, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी मिडकॅप निर्देशांक तेजीत वाढत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टॉप गेनर्स स्टॉकमध्ये महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस, हिरो मोटोकॉर्प आणि जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे शेअर्स सामील होते. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )

टॉप लुजर स्टॉकमध्ये सिप्ला, ब्रिटानिया, नेस्ले आणि ॲक्सिस बँकेचे शेअर्स सामील होते. दरम्यान तेजीच्या काळात मंगळवारी गुजरात टूल रूम कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 26.5 रुपये किमतीवर पोहचले होते. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 24.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4053 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 140 कोटी रुपये आहे.

गुजरात टूलरूम लिमिटेड ही एक मायक्रो कॅप कंपनी आहे. या कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीच्या 572.5 कोटी रुपये मूल्याच्या हायब्रीड ग्रीन एनर्जी प्लांट उभारणार असल्याची माहिती दिली आहे. या प्लांटमधून कंपनीला वार्षिक 146 कोटी रुपये नफा मिळू शकतो.

गुजरात टूल रूम लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीने नुकताच एक हायब्रीड ग्रीन एनर्जी पॉवर प्लांट उभारण्याची योजना आखली आहे. या प्लांटमध्ये ऊर्जा लँडस्केपमध्ये मोठा बदल करण्याची क्षमता आहे. या ग्रीन एनर्जी प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणुक आकर्षित होण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.

गुजरात टूल रूम कंपनीने या प्रकल्पासाठी भूसंपादन, अत्याधुनिक सौर पॅनेल, अत्याधुनिक पवन टर्बाइन, मजबूत केबल आणि पायाभूत सुविधा, ट्रान्सफॉर्मर आणि इतर पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ यासर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी स्वतंत्र निधी राखून ठेवला आहे. हा नवीन प्लांट गुजरात टूलरूम कंपनीला 4 रुपये प्रति युनिट विज किमतीवर प्रतिदिन 46.8 लाख रुपये महसूल कमावून देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE Live 15 May 2024.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x