22 November 2024 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय

Triveni Turbine Share Price

Triveni Turbine Share Price | त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 470 टक्के परतावा कमावून दिला आहे. 12 मे 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 मे 2024 रोजी हा स्टॉक 565 रुपये किमतीवर पोहोचला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्रिवेणी टर्बाइन कंपनीचे शेअर्स 555.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनी अंश )

त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड ही एक कर्जमुक्त कंपनी आहे. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.46 टक्के वाढीसह 581.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 38.24 टक्के वाढली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 17.624 कोटी रुपये आहे. त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 311.85 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 596.65 रुपये होती. त्रिवेणी टर्बाइन शेअर्सचा बीटा 0.7 आहे, जो एका वर्षात खूपच कमी अस्थिरता दर्शवतो. या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 54.6 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेडिंग करत नाही.

त्रिवेणी टर्बाइन कंपनीचे शेअर्स 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस, 200 दिवसाच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या वर आणि 5 दिवस आणि 10 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या सात प्रवर्तकानी कंपनीचे 55.84 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 44.16 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनीने अद्याप आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केलेले नाही. आर्थिक वर्ष 2022-23 च्या डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 52.60 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 30 टक्के वाढीसह 68 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 448.92 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर त्यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये कंपनीने 337.70 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 च्या तिमाहीमध्ये कंपनीचा खर्च 354.06 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जो त्यापूर्वी डिसेंबर 2022 तिमाहीत 267.66 कोटी रुपये होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Triveni Turbine Share Price NSE Live 15 May 2024.

हॅशटॅग्स

#Triveni Turbine Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x