22 November 2024 12:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा

Bonus Shares

Bonus Shares | ओरियनप्रो सोल्युशन्स या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2634 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच ओरियन सोल्युशन्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनी अंश )

या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी ओरियनप्रो सोल्युशन्स स्टॉक 2.05 टक्के घसरणीसह 2544 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीने अद्याप बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6300 टक्के परतावा कमावून दिला आहे. 7 मे 2020 रोजी ओरियनप्रो सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स 40.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 15 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2634 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 वर्षांत ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1470 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2799.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 496.35 रुपये होती.

मागील एका वर्षात ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 370 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 मे 2023 रोजी ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 551.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1841.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6900 कोटी रुपये आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 26.89 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Aurionpro Share Price 16 May 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x