22 November 2024 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7.02 टक्क्यांच्या वाढीसह 156.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. YTD आधारे आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.03 टक्के वाढीसह 157.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक बीएसईवर उच्च ट्रेडिंग व्हॉल्यूमसह ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे 51.80 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. हा आकडा मागील दोन आठवड्यांच्या सरासरी 41.90 लाख शेअर्सपेक्षा खूप जास्त होता. या स्टॉकमध्ये कालच्या एका दिवसात 79.11 कोटी रुपयेची उलाढाल झाली होती. आयआरएफसी कंपनीचे एकूण बाजार 2,02,300.47 कोटी आहे. टेक्निकल चार्टवर आयआरएफसी स्टॉकवर 142-140 रुपये किमतीजवळ मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 160-162 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे.

एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकमध्ये 134 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर शेअरने 160-162 रुपये झोनच्या आसपास मजबूत प्रतिकार पातळी तयार केली आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉक दैनिक चार्टवर मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 162 रुपये किमतीवर जाऊ शकतात. मात्र गुंतवणूकदारांनी पैसे लावताना 150 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावला पाहिजे.

Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकने 142.45 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट तयार केला आहे. या शेअरमध्ये 158.2 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 180 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. IRFC कंपनी मुख्यतः भारतीय रेल्वेला मालमत्तेचे संपादन किंवा निर्मितीसाठी वित्तपुरवठा करण्याचा व्यवसाय करते. तसेच ही कंपनी स्वतः देखील मालमत्ता अधिग्रहण करून भारतीय रेल्वेला भाडे तत्वावर देते. यासाठी ही कंपनी वित्तीय बाजारांतून निधी जमा करते. आयआरएफसी या कंपनीला भारत सरकारने ‘नवरत्न’ दर्जा बहाल केला आहे. डिसेंबर 2023 पर्यंत या सरकारी कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा 86.36 टक्के हिस्सा होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 16 May 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x