Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार?
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या विद्युत उपकरणे बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमवून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. ( अपार इंडस्ट्रीज अंश )
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8.6 टक्के वाढीसह 8398.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी अपार इंडस्ट्रीज स्टॉक 2.34 टक्के घसरणीसह 7,924.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 2 वर्षात अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1298 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 209 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील ट्रेडिंग सेशन अपार इंडस्ट्रीज कंपनीचे 0.28 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. या शेअर्सचे एकूण मूल्य 22.37 कोटी रुपये होते.
अपार इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 33,298 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 2650 रुपये होती. मार्च 2024 तिमाहीत अपार इंडस्ट्रीज कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 3 टक्के घसरला आहे. याकाळात कंपनीने 236.22 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 242.74 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 9 टक्के वाढीसह 4455 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 4084 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीचा EBITDA देखील 3 टक्के वाढीसह 457 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मार्च तिमाहीत शेअरचा ईपीएस 63.43 रुपयेवरून घसरुन 60.97 रुपयेवर आला आहे.
संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अपार इंडस्ट्रीज कंपनीने 13 टक्के वाढीसह 16,153 कोटी रुपये विक्रमी महसूल संकलित केला आहे. या कंपनीने संपूर्ण आर्थिक वर्षात 29 टक्के वाढीसह 825.11 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तिमाही निकालासोबत कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 51 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सचा RSI 59 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Apar Industries Share Price NSE Live 16 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार