23 November 2024 3:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका

PSU Stocks

PSU Stocks | ऑइल इंडिया लिमिटेड या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही सरकारी कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने 20 मे रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करु शकतात. ( ऑइल इंडिया लिमिटेड कंपनी अंश )

20 मे रोजी होणाऱ्या बैठकीत कंपनीचे संचालक मार्च 2024 तिमाहीचे निकाल देखील मंजूर करतील. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.27 टक्के वाढीसह 641.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑइल इंडिया लिमिटेड कंपनी आपल्या शेअरधारकांना चौथ्यांदा मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने पूर्वी 3 वेळा गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स वाटप केले आहेत. मार्च 2012 मध्ये कंपनीने 3:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. तर जानेवारी 2017 मध्ये कंपनीने 1:3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. आणि मार्च 2018 मध्ये कंपनीने 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

मागील 1 वर्षात ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 142 टक्के परतावा कमावून दिला आहे. 16 मे 2023 रोजी ऑइल इंडिया कंपनीचे शेअर्स 261.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 631.85 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील 6 महिन्यांत ऑइल इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 96 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 322.80 रुपयेवरून वाढून 630 रुपये किमतीवर पोहचले होते. 2024 या वर्षात या कंपनीचे शेअर्स 67 टक्के वाढले आहेत. ऑइल इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 669.50 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 240.80 रुपये होती.

BPCL आणि HPCL या कंपन्यांनी देखील आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही कंपन्या आपल्या गुंतवणुकदारांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. या कंपन्यानी बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी 22 जून हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने देखील आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. HPCL कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर्स वाटप करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PSU Stocks of Indian Oil Share Price 16 May 2024.

हॅशटॅग्स

PSU Stocks(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x