17 September 2024 12:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरची जादू, 1 वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 2.3 कोटी रुपये - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News
x

Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग

Sterling and Wilson Share Price

Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना सहा महिन्यांत मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत हा स्टॉक 156 टक्के मजबूत झाला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 760 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत व्यवहार करतोय. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनी अंश )

मागील काही दिवसापासून या स्टॉकमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत होते. आता मात्र हा स्टॉक पुन्हा एकदा तेजीत आला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 17,725.69 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी 253.45 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के वाढीसह 773.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

येस सिक्यूरिटीज फर्मने स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर 900 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. या कंपनीला आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये विद्यमान ग्राहक आणि PSUs कडून मोठ्या ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये या कंपनीला रिलायन्स आणि नायजेरियामधून काही ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे कंपनीची ऑर्डर बुक मजबूत होईल.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांनी स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 850 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 2026 पर्यंत जागतिक सौर PV क्षमता दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी सारख्या कंपन्यांना होऊ शकतो.

स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्सचा RSI 66.4 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. या स्टॉकचा बीटा 0.7 आहे, जो एका वर्षात कमी अस्थिरता दर्शवतो. स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी ही कंपनी मुख्यतः नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम संबंधित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sterling and Wilson Share Price NSE Live 16 May 2024.

हॅशटॅग्स

Sterling and Wilson Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x