22 November 2024 6:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 647.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.45 लाख कोटी रुपये आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 171 टक्के परतावा कमावून दिला आहे. अदानी पॉवर स्टॉकचा बीटा 0.7 आहे, जो एका वर्षात खूपच कमी अस्थिरता दर्शवतो. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.43 टक्के घसरणीसह 637 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

दैनंदिन चार्टवर अदानी पॉवर स्टॉक 648 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार देत आहे. जर हा स्टॉक या किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 700 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकवर 650 रुपये या शॉर्टटर्म टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 570 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

अरिहंत कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांच्या मते, अदानी पॉवर स्टॉक 641 रुपयांच्या पार गेला तर अल्पावधीत स्टॉक 661 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 580 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. अदानी पॉवर स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 61.4 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. अदानी पॉवर स्टॉक आपल्या 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 16 May 2024.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x