8 September 2024 7:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली

Zen Technologies Share Price

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. आज देखील हा स्टॉक किंचित घसरणीसह ट्रेड करत आहे. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )

मागील तीन वर्षांच्या कालावधीत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 420 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 952.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील चार वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1252 टक्के परतावा कमावून दिला आहे. तीन वर्षांपूर्वी झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 185 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 952 रुपये किमतीवर पोहचला आहे. 2 मे 2024 रोजी या कंपनीच्या शेअरने 1130 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. मागील वर्षी 16 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 306.45 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मार्च 2024 तिमाहीत झेन टेक्नॉलॉजी कंपनीने मागील वर्षीच्या 74.33 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत 85 टक्के वाढीसह 138.04 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 33.04 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 17.27 कोटी रुपये नफा कमावला होता.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2024 मध्ये झेन टेक्नॉलॉजी कंपनीने ऑपरेशनल महसुलात 167 टक्के वाढ नोंदवली आहे. या कालावधीत कंपनीचा महसूल वाढून 430.28 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीच्या वार्षिक नफ्यात 243 टक्के लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये झेन टेक्नॉलॉजी कंपनीने 37.64 कोटी रुपये नफा कमावला होता. तर 2023-24 मधे कंपनीने 129.23 कोटी रुपये नफा कमावला आहे.

झेन टेक्नॉलॉजी कंपनी आर्थिक वर्ष 2023-24 साठी आपल्या गुंतवणुकदारांना अंतिम लाभांश देखील वाटप करणार आहे. 31 मार्च 2024 पर्यंत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 1400 कोटी रुपये होता. मेक इन इंडिया सारख्या स्वदेशी उपक्रमामुळे आणि आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांमुळे तसेच वाढत्या संरक्षण बजेटमुळे झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या ऑर्डरमध्ये वाढ होत आहे. कंपनीला पुढील काळात संरक्षण आणि सुरक्षा दलांसाठी लढाऊ प्रशिक्षण उपाय आणि ड्रोन प्रणाली तयार करण्याच्या अनेक ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zen Technologies Share Price NSE Live 16 May 2024.

हॅशटॅग्स

Zen Technologies Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x