22 November 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 293 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

मागील 6 महिन्यांत या रेल्वे कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 77 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.60 रुपये होती. तर नीचांकी पातळी 110.50 रुपये होती. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल स्टॉक 7.05 टक्के वाढीसह 300 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आरव्हीएनएल कंपनीला नुकताच भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागाकडून 239 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. मागील 4 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1600 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 22 मे 2020 रोजी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 17.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 17 मे 2024 रोजी हा स्टॉक 293 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 3 वर्षांत, रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 875 टक्के परतावा कमावून दिला आहे.

21 मे 2021 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 29.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 300 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. 17 मे 2023 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 121.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 2024 या वर्षात, रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 63 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 182.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स 300 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 18 May 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x