3 November 2024 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी संधी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IRB Share Price | IRB शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, 51 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल - NSE: IRB Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडामार्फत 1 करोड जमा करण्यासाठी 8-4-3 फॉर्मुला वापरा, वेगाने वाढेल पैशाने पैसा - Marathi News Gratuity on Salary | 5 वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा मिळणार ग्रॅच्युईटीचे 20 लाख रुपये, फायद्याची अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | पोस्टाच्या जबरदस्त योजनेत चांगल्या परताव्यासह मिळणार टॅक्स सूट, फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या Salary Account Benefits | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट असेल तर 'या' गोष्टी माहित करून घ्या, फ्री मिळतात अनेक सुविधा Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा
x

Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह 13.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरूवारी संध्याकाळी व्होडाफोन आयडिया कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यात कंपनीने 7675 कोटी रुपये तोटा झाला असल्याची माहिती दिली आहे. तरीही शुक्रवारी हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

मार्च 2024 तिमाही निकालांमध्ये कंपनीने तोटा वाढल्याची बातमी दिली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 6,419 कोटी रुपये तोटा झाला होता. मार्च 2024 तिमाहीत कंपनीने 10,607 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 10,532 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.14 टक्के वाढीसह 13.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्होडाफोन आयडिया कंपनीने आयकर रिफंडच्या माध्यमातून 12,100 करोड़ रुपये कॅश फ्लो जनरेट केला आहे. तर कंपनीची कैपेक्स आणि स्पेक्ट्रम देणी वार्षिक आधारावर 60 टक्के घसरून 2,000 कोटी रुपये झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये हे प्रमाण 5,500 कोटी रुपये होते. व्होडाफोन आयडिया कंपनीने 2,900 कोटी रुपये व्याज देणी दिल्यानंतर 7300 कोटी रुपयेचा एफसीएफ शिल्लक राहिला आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीचा ग्राहकवर्ग मार्च 2024 तिमाहीत 26 लाखांनी कमी झाला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा ग्राहकवर्ग 46 लाखांनी कमी झाला होता. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या 21.26 कोटीवर आली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.

व्होडाफोन आयडिया स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड स्टॉक आहे. त्यामुळे जर हा स्टॉक तेजीत आला तर अल्पावधीत शेअर 23 रुपये किमतीवर जाऊ शकतो. बँक ऑफ अमेरिकाच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक पुढील काळात 14.5 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र बँक ऑफ अमेरिकाने हा स्टॉक लोकसभा निवडणुकीनंतर दूरसंचार दर वाढवल्यास 20-25 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मागील महिन्यात व्होडाफोन आयडिया स्टॉकची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाली होती. 11 रुपयेचा FPO इश्यू 7.2 टक्के प्रीमियमने वाढला होता. व्होडाफोन आयडिया कंपनीने FPO च्या माध्यमातून नेटवर्क पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि कॅपेक्स उद्देशांसाठी भांडवल उभारणी केली आहे. कंपनीला आपल्या विद्यमान 4G आणि 5G पायाभूत सुविधामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 18 May 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(111)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x