18 October 2024 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 690 रिक्त जागांसाठी भरती, पगार 1,42,000 रुपये, असा करा अर्ज - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरने यावर्षी 41% परतावा दिला, तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN GTL Share Price | GTL पेनी शेअर 45 रुपयांची पातळी स्पर्श करणार, कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला - BSE: 513337 Horoscope Today | या राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार, प्रमोशन वाढीचा देखील आहे योग, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य Festive Season Fashion | सणासुदीच्या काळात हवा आहे परफेक्ट लूक, तर या 4 साड्यांचे कलेक्शन तुमच्याजवळ असलेच पाहिजे Viral Video | गिटार वाजवून अन् गाणं गाऊन विकली भाजी, विक्रेत्याची अनोखी शक्कल, VIDEO व्हायरल - Marathi News
x

L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या

L&T Share Price

L&T Share Price | एल अँड टी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 3,446.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीला कोलकाता येथील राजरहाट येथे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कॅम्पस बांधण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस कोलकाता कडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य जवळपास 1,000 कोटी ते 2,500 कोटी रुपये दरम्यान आहे. ( एल अँड टी कंपनी अंश )

शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये एल अँड टी स्टॉक 0.20 टक्के वाढीसह 3,467.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

लार्सन अँड टुब्रो कन्स्ट्रक्श कंपनीच्या बिल्डिंग्स अँड फॅक्टरीज बिझनेस शाखेला अनेक ऑर्डर मिळाल्या आहेत. हेल्थ बिझनेस युनिटच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस कोलकाताने एक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बांधण्यासाठी एल अँड टी कंपनीला ऑर्डर दिली आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत कंपनीला कोलकाता येथील कॅम्पसमध्ये 605 खाटांचे रुग्णालय, 150 विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेश क्षमता असलेले कॉलेज, वसतिगृहे, परिचारिका आणि रहिवाशांचे क्षेत्र यांचे बांधकाम करायचे आहे.

एल अँड टी कंपनीला हा प्रोजेक्ट 60 महिन्यांच्या आत पूर्ण करायचे आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. एल अँड टी कंपनीला त्याच्या काही विद्यमान ग्राहकांकडून देखील ॲड-ऑन ऑर्डर मिळाल्या आहेत. एल अँड टी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवसाअखेर 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 3,446.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. YTD आधारे एल अँड टी स्टॉक 2.15 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

एल अँड टी कंपनीचे एकूण बाजार भांडवल बाजार भांडवल 4,73,836.53 कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षात एल अँड टी कंपनीच्या कमाई वाढीचा अंदाज वाढला आहे. सार्वत्रिक निवडणुका आणि जागतिक तणावामुळे आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये कंपनीचा ऑर्डर प्रवाह आणि महसूल प्रभावित होऊ शकतो. एल अँड टी कंपनीने आर्थिक वर्ष 2024-2025 साठी 8.25 टक्के मार्जिनचा अंदाज देखील वर्तवला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price NSE Live 18 May 2024.

हॅशटॅग्स

L&T Share Price(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x