22 November 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला

Mazagon Dock Share Price

Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक शुक्रवारी 14.57 टक्के वाढीसह 2794.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 55,808 कोटी रुपये आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमधे या कंपनीचे एकूण 3.61 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. ( माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी अंश )

आज शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक जोरदार तेजीत वाढत होता. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक 17.80 टक्के वाढीसह 2,874 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

2024 या वर्षात माझगाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉकची किंमत 21 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 245 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील दोन वर्षांत हा स्टॉक 844.71 टक्के मजबूत झाला आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सचा एक वर्षाचा बीटा 0.4 आहे, जो या कालावधीत खूपच कमी  स्थिरता दर्शवतो. या स्टॉकचा RSI 61.8 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहेत. प्रोग्रेसिव्ह शेअर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, माझगाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक पुढील काळात 3170 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, माझगाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक दैनंदिन चार्टवर तेजीचे संकेत देत आहे. या स्टॉकमध्ये 2380 रुपये किमतीवर मजबूत समर्थन पाहायला मिळत आहे. तर 2595 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 2726 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

StoxBox फर्मच्या फर्मच्या तज्ञांच्या मते, माझगाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉकमध्ये 2550 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर या स्टॉकमध्ये ब्रेकआउट झाला तर शेअर 2900 रुपयेपर्यंत वाढू शकतो. कंपनीने आपली मार्च 2024 तिमाहीचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाही.

डिसेंबर 2023 तिमाहीत माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने 77 टक्के वाढीसह 626.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 354 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 तिमाही कालावधीत माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने 1,815.9 कोटी रुपयये महसूल संकलित केला होता. त्या तुलनेत डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 30 टक्के वाढीसह 2,362.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा EBITDA म्हणजेच ऑपरेटिंग प्रॉफिट वार्षिक 82 टक्के वाढीसह 539 कोटी रुपयेवर पोहोचला आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी मुख्यतः जहाज बांधणी आणि ऑफशोअर फॅब्रिकेशन यार्ड संबंधित काम करते. ही कंपनी जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि ऑफशोअर स्ट्रक्चर्सची निर्मिती करण्याचे काम करते. तसेच ही कंपनी युद्धनौका, व्यापारी जहाजे, पाणबुड्या, सपोर्ट व्हेसल्स, ऑफशोअर प्लॅटफॉर्म, प्रवासी व मालवाहू जहाजे, ट्रॉलर, मुख्य आणि हेलीडेक्स आणि बार्जेस बनवण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mazagon Dock Share Price NSE Live 18 May 2024.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x