17 September 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरची जादू, 1 वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 2.3 कोटी रुपये - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News
x

Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांसाठी अनेक खास योजना चालवल्या जातात, ज्यात तुम्हाला कोट्यवधींचा फायदा मिळतो. आज आम्ही तुम्हाला एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला सरकारकडून पूर्ण 35 लाख रुपये मिळतील. तुम्हालाही जोखीम न पत्करता करोडपती व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. पोस्ट ऑफिस आणि बँक एफडी हा अजूनही गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानला जातो.

योजनेचे नाव काय आहे?
या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव ग्राम सुरक्षा योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला सरकारकडून पूर्ण 35 लाख रुपये मिळतात. ही योजना इंडिया पोस्टने ग्राहकांसाठी सुरू केली होती. हा प्रोटेक्शन प्लॅन एक असा पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवू शकता. या योजनेत तुम्हाला दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतील.

35 लाखांपर्यंत मिळणार लाभ
जर तुम्ही या योजनेत नियमित पैसे गुंतवले तर येत्या काळात तुम्हाला 31 लाख ते 35 लाख रुपयांचा फायदा मिळेल.

कसा अणि किती मिळेल फायदा?
समजा वयाच्या 19 व्या वर्षी एखाद्या व्यक्तीने या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केली तर 55 वर्षांसाठी त्याचा मासिक प्रीमियम 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशा परिस्थितीत पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल.

जाणून घ्या गुंतवणुकीचे नियम
* 19 ते 55 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
* या योजनेअंतर्गत किमान विम्याची रक्कम 10,000 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
* या योजनेचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक भरता येतो.
* प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला 30 दिवसांची सूट मिळते.
* तुम्ही या योजनेवर कर्जही घेऊ शकता.
* ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनंतर तुम्ही ती सरेंडरही करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Scheme Gram Suraksha Yojana Benefits 19 May 2024.

हॅशटॅग्स

Post office Scheme(157)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x