22 November 2024 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल?

NMDC Share Price

NMDC Share Price | एनएमडीसी या नवरत्न दर्जा असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या लोहखनिज कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे. त्यामुळे अनेक ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी कंपनीचे शेअर्स अल्प मुदतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( एनएमडीसी कंपनी अंश )

एनएमडीसी स्टॉकने मागील आठवड्यात 280 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी एनएमडीसी स्टॉक 5.30 टक्के वाढीसह 279.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

SBI सिक्युरिटीज फर्मने एनएमडीसी स्टॉक पुढील 3 महिन्यांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 274.30 रुपये ते 279.7 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक पुढील काही दिवसांत 305 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत NMDC ही देशातील सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक आहे.

एनएमडीसी कंपनीच्या मुख्य खाणी छत्तीसगड आणि कर्नाटक राज्यात आहेत. एनएमडीसी ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या लोहखनिज उत्पादकांपैकी एक मानली जातो. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश आणि ग्राहक आहे. आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत या कंपनीची उत्पादन क्षमता 51.8 दशलक्ष टनांवरून वाढून 67 दशलक्ष टनांवर नेण्याचे उद्दिष्ट कंपनीने निश्चित केले आहे.

मागील एका आठवड्यात एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 10 टक्के मजबूत झाले होते. तर मागील दोन आठवड्यात या कंपनीचे शेअर्स फक्त 4 टक्के वाढले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्के वाढली होतो. 2024 या वर्षात एनएमडीसी स्टॉक आतापर्यंत 32 टक्के वाढला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66 टक्के आणि मागील एका वर्षात 165 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Share Price NSE Live 20 May 2024.

हॅशटॅग्स

NMDC Share price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x