22 November 2024 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Nissan X Trail | दमदार Nissan X Trail SUV लाँच होतेय, थेट फॉर्च्युनर, ग्लॉस्टर, कोडियाक मॉडेल्सला पर्याय

Nissan X Trail

Nissan X Trail | निसान लवकरच आपली एक्स-ट्रेल SUV भारतीय बाजारात लाँच करणार आहे. भारतीय रस्त्यांवर ही एसयूव्ही अनेकदा टेस्टिंग करताना दिसली आहे. तर 2021 पासून त्याची विक्री देशाबाहेर केली जात आहे. निसान एक्स-ट्रेल ही फुलसाइज एसयूव्ही आहे.

रेनो-निसान-मित्सुबिशी संयुक्त CMF-C क्रॉसओव्हर प्लॅटफॉर्मवर हे विकसित करण्यात आले आहे. भारतीय बाजारात सध्या निसानची एकच मॅग्नाइट कार आहे. कंपनीने नुकतेच आपले नवे गिझा स्पेशल एडिशन लाँच केले आहे.

निसान एक्स-ट्रेल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
निसान एक्स-ट्रेलमध्ये 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन सह माइल्ड हायब्रीड पॉवरट्रेन आणि 1.5 लीटर टर्बो पेट्रोल युनिटसह मजबूत हायब्रीड पॉवरट्रेन देण्यात आली आहे. माइल्ड हायब्रीड व्हेरियंटमध्ये 2WD सिस्टीम देण्यात आली असून 163PS//1200 पॉवर सिस्टिम देण्यात आली आहे. 300 एनएम चे आउटपुट देते. ही कार 9.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. याची टॉप स्पीड ताशी 200 किमी आहे.

एक्स-ट्रेल एसयूव्हीमध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 12.3 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, ट्राय झोन क्लायमेट कंट्रोल, 12.3 इंचाचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एलईडी हेडलॅम्प्स, हेड-अप डिस्प्ले (एचयूडी), इलेक्ट्रिक टेलगेट, 360 डिग्री कॅमेरा आणि बरेच काही मिळेल.

त्याची लांबी 4680mm मिमी, रुंदी 2065mm आणि उंची 1725mm असेल. यात व्हीलबेस 2750mm आणि ग्राउंड क्लिअरन्स 205mm असेल. ग्लोबल व्हेरियंटमध्ये 5 आणि 7 सीटर असे दोन सीटिंग कॉन्फिगरेशन देण्यात आले आहेत. टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लॉस्टर, इसुजू एमयू-एक्स, स्कोडा कोडियाक यांसारख्या मॉडेल्सशी त्याची टक्कर होणार आहे.

News Title : Nissan X Trail specifications and price in India 24 May 2024.

हॅशटॅग्स

#Nissan X Trail(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x