21 November 2024 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक

IEL Share Price

IEL Share Price | आयईएल लिमिटेड या केमिकल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 5384 टक्के वाढले आहेत. मार्च 2020 मध्ये आयईएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर नुकताच हा स्टॉक 7.13 रुपये किमतीवर पोहचला होता.

मागील 1 वर्षात आयईएल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 52 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. YTD आधारे आयईएल लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक 32 टक्क्यांनी घसरला आहे. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी आयईएल लिमिटेड स्टॉक 0.43 टक्के घसरणीसह 6.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

2024 या वर्षात आयईएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स जवळजवळ सर्व महिन्यात विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. एप्रिल 2024 मध्ये हा स्टॉक 9.5 टक्के घसरला होता. तर मार्च 2024 मध्ये हा स्टॉक 10 टक्के घसरला होता. फेब्रुवारी महिन्यात आयईएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.8 टक्के आणि जानेवारीमध्ये 4.5 टक्के घसरले होते. मे महिन्यात हा स्टॉक 6 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची अल्पकालीन कामगिरी फरशी लक्षणीय नसली तरी दीर्घकालीन कामगिरी मात्र जबरदस्त आहे.

9 जून 2023 रोजी आयईएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20.59 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या उच्चांक किमतीवरून हा स्टॉक 66 टक्क्यांनी घसरला. 4 एप्रिल 2024 रोजी आयईएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.69 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमतीवर ट्रेड करत होते.

मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 566 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1196 टक्के वाढली आहे. आयईएल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील दहा वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 2592 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मार्च 2024 तिमाहीत आयईएल लिमिटेड कंपनीने 781.5 टक्के वाढीसह 9.12 कोटी रुपये निव्वळ विक्री नोंदवली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण 1.03 कोटी रुपये होते. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 0.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर मागील वर्षी मार्च तिमाहीत कंपनीने 0.04 कोटी रुपये तोटा नोंदवला होता. वर्ष-दर-वर्ष आधारावर आयईएल लिमिटेड कंपनीने निव्वळ विक्रीत 55.9 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आयईएल लिमिटेड कंपनीने 2.34 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तो आता 2023-24 मध्ये 0.26 कोटीवर आला आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 दरम्यान आयईएल लिमिटेड कंपनीने स्टॉक स्प्लिट केला होता. 25 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IEL Share Price NSE Live 24 May 2024.

हॅशटॅग्स

IEL Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x