22 November 2024 4:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | रॉकेट वेगाने परतावा मिळणार! यापूर्वी दिला 700% परतावा, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये 278 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत कंपनीने 254 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीने 1,690 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 2023-24 मध्ये कंपनीने 2,179 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.97 टक्के घसरणीसह 45.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा EBITDA 232.60 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा EBITDA 357.2 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचा EBITDA मार्जिन 13.7 टक्केवरून वाढून 16.3 टक्के नोंदवला गेला आहे. 31 मार्च 2024 पर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीचा कॅश इन हॅण्ड 1148 कोटी रुपये होता.

मागील एका वर्षभरात सुझलॉन कंपनीने 882 मेगावॅट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यात 78 टक्के वाढ झाली आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 350 टक्के वाढली आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 700 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 25 May 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x