25 November 2024 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Ashok Leyland Share Price | स्टॉक ब्रेकआऊट संकेत! अशोक लेलँड शेअर्स सुसाट तेजीचे परतावा देणार, फायद्याची अपडेट

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी अशोक लेलँडने मार्च 2024 तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहे. या कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 20 टक्के वाढीसह 900 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च तिमाहीत या कंपनीचा EBITDA 25 टक्के वाढून 1592 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

मार्च 2024 तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 14.1 टक्के नोंदवला गेला होता. मार्च तिमाहीच्या निकालानंतर या कंपनीचे शेअर्स 219 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.85 टक्के घसरणीसह 210.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

हिंदुजा ग्रुपचा भाग असलेल्या अशोक लेलँड कंपनीने मार्च तिमाहीत 14.1 टक्के विक्रमी EBITDA मार्जिन नोंदवला होता. एका वर्षापूर्वी हे प्रमाण 11 टक्के नोंदवले गेले होते. या कंपनीचा ऑपरेटिंग नफा म्हणजेच EBITDA मार्च 2024 तिमाहीत 1592 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आणि त्यात वार्षिक आधारावर 24.8 टक्के वाढ झाली होती.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये अशोक लेलँड कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 3.1 टक्के घसरणीसह 11267 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या काळात कंपनीचा निव्वळ नफा 19.8 टक्के वाढीसह 900.4 कोटी रुपये नोंदवला गेला होता. अशोक लेलँड कंपनीकडे सध्या कॅश इन हॅण्ड 1658 कोटी रुपये आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत 2023-24 मध्ये अशोक लेलँड कंपनीचा महसूल 6 टक्के वाढीसह 38367 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. अशोक लेलँड कंपनीचा ऑपरेटिंग पीबीटी 92 टक्के वाढीसह 3886 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर कंपनीचा निव्वळ नफा 90 टक्के वाढीसह 2618 कोटी रुपये नोंदवला गेला होता. अशोक लेलँड कंपनीवर सध्या 89 कोटी रुपये निव्वळ कर्ज आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 25 May 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x