22 November 2024 4:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Infosys Share Price | इन्फोसिस स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी

Infosys Share Price

Infosys Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात इन्फोसिस स्टॉक गुंतवणुक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. तज्ञांच्या मते, इन्फोसिस कंपनीने मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत फारसे अनुकूल निकाल जाहीर केले नाही.

मात्र हा स्टॉक अल्पावधीत सततच्या घसरणीमुळे 1730 रुपये या उच्चांक किमतीवरून 1380 रुपये किमतीवर आला होता. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.67 टक्के घसरणीसह 1,462.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील काही ट्रेडिंग सत्रांपासून इन्फोसिस स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. हा स्टॉक हळूहळू आपल्या 1490 रुपये या रेझिस्टन्स झोनकडे मार्गक्रमण करत आहे. Axis Securities फर्मने इन्फोसिस स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉक पुढील काळात 1630 रुपये किमतीवर जाऊ शकतो. इन्फोसिस ही एक लार्ज कॅप आयटी कंपनी असून तिचे एकूण बाजार भांडवल 611173.73 कोटी रुपये आहे.

ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉक लवकरच आपली प्रतिकार पातळी ओलांडून 1630 रुपये ही टार्गेट प्राइस हीट करेल. इन्फोसिस कंपनीने 31-03-2024 ला संपलेल्या तिमाहीमध्ये 40652.00 कोटी रुपये एकत्रित उत्पन्न कमवले होते. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 39610.00 कोटी रुपये कमाई केली होती. यात वार्षिक आधारावर आता 2.63 टक्के वाढ झाली आहे. मार्च 2024 तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 7975.00 कोटी रुपये PAT नोंदवला होता. 31 मार्च 2024 पर्यंत इन्फोसिस कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 14.71 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर FII ने कंपनीचे 34.11 टक्के आणि DII ने कंपनीचे 35.56 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 25 May 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x