23 November 2024 5:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Bonus Share News | फायदाच फायदा! फ्री शेअर्स मिळवा, कंपनीने केली फ्री बोनस शेअर्सची घोषणा

Bonus Share News

Bonus Share News | एमएम फोर्जिंग्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. एमएम फोर्जिंग्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 29 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मार्च तिमाहीचे निकाल तसेच बोनस शेअर्सबाबत चर्चा करतील. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी एमएम फोर्जिंग्स स्टॉक 10.52 टक्के वाढीसह 1,245.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( एमएम फोर्जिंग्स कंपनी अंश )

मागील 6 वर्षात पहिल्यांदाच एमएम फोर्जिंग्स ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने 2018 मध्ये बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यापूर्वी कंपनीने 2008 मध्ये बोनस शेअर्स वाटप केले होते. या दोन्ही वेळा कंपनीने 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. मागील 2 वर्षात या कंपनीने आपल्या शेअरधारकांना 2 वेळा लाभांश वाटप केला होता. 2022 आणि 2023 मध्ये या कंपनीने प्रति शेअर 6 रुपये लाभांश वाटप केला होता.

एमएम फोर्जिंग्स ही कंपनी मुख्यतः निर्यात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी देशांतर्गत बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्लोज्ड डाय फोर्जिंग सेवा प्रदान करते. या कंपनीकडे सध्या 10 प्लांट आहेत, ज्यांची क्षमता 1.1 लाख मेट्रिक टन आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी एमएम फोर्जिंग्स कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांच्या घसरणीसह क्लोज झाले होते. 2024 या वर्षात एमएम फोर्जिंग्स स्टॉक 15.5 टक्के मजबूत झाला आहे. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षांत हा स्टॉक दुप्पट झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News MM Forgings Share Price 27 May 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x