10 November 2024 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, या SBI म्युच्युअल फंडातील 37 रूपयांची बचत देईल मोठा परतावा, संधी सोडू नका - Marathi News Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल Railway Ticket Booking | रेल्वे देते तिकीट बुकिंगची ही जबरदस्त सुविधा, कन्फर्म तिकीट सह प्रवास होईल सुखकर, फायदा घ्या Gratuity On Salary | 25000 रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना सुद्धा ग्रॅच्युएटीची मोठी रक्कम मिळणार, रक्कम लक्षात ठेवा - Marathi News Penny Stocks | 68 पैशाचा शेअर धुमाकूळ घालणार, एका वडापावच्या किंमतीत 30 शेअर्स येतील, मोठी कमाई होईल - BOM: 539217
x

Tata Technologies Share Price | तज्ज्ञांकडून IREDA, Tata Tech स्टॉकबाबत मोठी अपडेट, 'BUY' करावा की 'Sell'?

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | नुकताच FTSE निर्देशांकात बदल झाले आहे. याचा परिणाम IREDA, Tata Tech आणि JSW इंफ्रा यासारख्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे. JSW इन्फ्रा, टाटा टेक आणि IREDA सारख्या कंपन्यांनी FTSE इंडेक्समध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी शेअर बाजार उघडताच या तिन्ही स्टॉकवर जबरदस्त उलाढाल पहायला मिळाली होती.

JSW Infra कंपनीचे शेअर्स 1.34 टक्क्यांच्या घसरणीसह 275 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 56,420 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 285 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 142 रुपये आहे.

मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के आणि 6 महिन्यांत 32 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीचे शेअर्स 75 टक्के वाढले आहेत. आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी JSW इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 282.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IREDA कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.7 टक्क्यांच्या घसरणीसह 185.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. IREDA या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 50,000 कोटी रुपये आहे. ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची अक्षय ऊर्जा विकास संस्था आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 215 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 50 रुपये होती.

मागील एका वर्षात IREDA शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 210 टक्के नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.39 टक्के घसरणीसह 186.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा टेक स्टॉक 3.23 टक्के वाढून 1083 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. टाटा टेक कंपनीचे शेअर्स आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी 1.58 टक्के घसरणीसह 1,073.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये एफटीएसई इंडेक्समध्ये बदल करण्यात आले होते. त्यावेळी भारताचे एकूण वेटेज 2.56 टक्क्यांपर्यंत वाढले होते. FTSE ऑल वर्ल्ड इंडेक्स लार्ज आणि मिड कॅप शेअर्सच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करतो. 31 जानेवारी 2024 पर्यंत, FTSE मध्ये 213 भारतीय कंपन्याचे शेअर्स सामील करण्यात आले होते. त्यात भारताचे वेटेज 2.06 टक्के होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies Share Price NSE Live 28 May 2024.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x