22 November 2024 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे
x

Patel Engineering Share Price | स्टॉक चार्टने दिले संकेत, 59 रुपयाचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी 3 टक्के घसरणीसह 60.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुतवणूकदारांना उत्कृष्ट नफा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 26 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. ( पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनी अंश )

मेहता इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, पटेल इंजिनियरिंग लिमिटेड स्टॉक 89 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.87 टक्के घसरणीसह 59.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मने पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 80 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.

31 मार्च 2024 पर्यंत या कंपनीकडे एकूण 18,663 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर होत्या. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.75 रुपये होती. पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,154.92 कोटी रुपये आहे.

मागील पाच वर्षांत पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्के परतावा कमावून दिला आहे. पटेल इंजिनियरिंग लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान केले आहे. 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 657 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

नुकताच या कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत या कंपनीचा PAT 78 टक्क्यांनी वाढून 140.35 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. एका वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीचा PAT 78.83 कोटी रुपये होता. जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत कंपनीचे परिचलन उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढून 1,343.18 कोटी रुपये नोंदवले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण 1205.06 कोटी रुपये होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price NSE Live 28 May 2024.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x