22 November 2024 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Ashok Leyland Share Price | शेअर स्पीड पकडणार! वेगाने परतावा देणार, तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस किती?

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड या ऑटोमोबाईल कंपनीचे शेअर्स सोमवारी 8 टक्के वाढीसह 227.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने मार्च 2024 तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाही निकालानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्यानी हा स्टॉक बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )

एमके इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांनी अशोक लेलँड स्टॉकवर 250 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी अशोक लेलँड स्टॉकवर 245 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तर अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने अशोक लेलँड स्टॉकवर 248 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.24 टक्के वाढीसह 227.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नुकताच अशोक लेलँड कंपनीने केएम बालाजी यांना कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. आणि कंपनीचे सीएफओ आणि पूर्ण वेळ संचालक गोपाल महादेवन हे डायरेक्टर-स्ट्रॅटेजिक फायनान्स आणि M&A म्हणून काम करतील.

आपल्या नवीन पदाची जबाबदारी हाताळताना गोपाळ महादेवन अशोक लेलँड कंपनीच्या उपकंपन्यांचा विकास अजेंडा तसेच M&A धोरणांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. मार्च तिमाहीत अशोक लेलँड कंपनीचा निव्वळ नफा जवळपास 17 टक्क्यांच्या वाढीसह 933.69 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीने 799.87 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत अशोक लेलँड कंपनीने 13,229.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जो आता मार्च 2024 मध्ये 13,613.29 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अशोक लेलँड कंपनीचा एकूण महसूल 45,931.22 कोटी रुपये संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 41,779.71 कोटी रुपये महसूल नोंदवला होता. मागील एका वर्षभरात अशोक लेलँड कंपनीच्या भारताती शोरुमच्या संख्येत 246 नवीन शोरूमची भर पडली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 28 May 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x