22 November 2024 6:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आज २०वा कारगिल विजय दिवस; देशभरात विविध कार्यक्रमांच आयोजन

Kargil Day, Indian Army, Pakistan Army

मुंबई : कारगिल विजय दिवसाची २० वी वर्षपूर्ती आज देशभर साजरी केली जात आहे. २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्याचंच स्मरण म्हणून आज देशभरात ठिकठिकाणी शहिदांना आदरांजली वाहिली जाते.

राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कारगिल-द्रासमध्ये कार्यक्रमाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होतील. तर विजय दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होतील. दरम्यान, १९९९ सालचे कारगिल युद्ध जवळपास ६० दिवस सुरू होते . ८ मे ते २६ जुलै दरम्यान झालेल्या युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाले होते, तर १३६३ जवान जखमी झाले होते. या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.

पण हे सर्व इस्रायल या देशाच्या मदतीमुळेच शक्य झाले होते. पाकिस्ताननं भारताला अंधारात ठेवून कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. घुसखोरीच्या ब-याच काळानंतर भारताला याची भणक लागली. जवळपास भारताच्या सर्वच चौक्यावर त्यावेळी पाकिस्तानच्या सैन्यानं ताबा मिळवला होता. पण एवढ्या उंचावर युद्ध करून त्या चौक्या परत मिळवणे हे भारतीय लष्करासाठी थोडं जिकिरीचं काम होतं. तसेच कुरापतखोर पाकिस्ताननं कोणकोणत्या चौक्यांवर ताबा मिळवलाय आणि किती प्रमाणात पाकिस्तानी सैन्यानं घुसखोरी केली आहे हे जाणून घेण्यासाठी भारताकडे त्यावेळी अत्याधुनिक अशी प्रणाली नव्हती.

अशातच कारगिल युद्धाच्या वेळी मित्रधर्माला जागून इस्रायल हा देश भारताच्या मदतीला धावून आला होता. त्यावेळी इस्रायलनं भारताला युद्धासाठी मोर्टार, दारूगोळा आणि लढाऊ विमानांसाठी आवश्यक असणा-या लेझर गाइडेड मिसाइल पुरवल्या होत्या. ड्रोनसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्रायलनं त्यावेळी हेरॉन आणि सर्चर हे दोन प्रकारचे ड्रोन भारताला पुरवले होते. या ड्रोनमुळेच भारतीय लष्कराला कारगिलमध्ये लपून बसलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा फोटो सापडून त्यांचा ठावठिकाणा लागला होता.

हॅशटॅग्स

#India Pakistan(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x