22 November 2024 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. टीबीआय कॉर्न कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 31 मे 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO 4 जून 2024 पर्यंत खुला असेल. या कंपनीच्या IPO चा आकार 44.94 कोटी रुपये आहे. ( टीबीआय कॉर्न कंपनी अंश )

टीबीआय कॉर्न कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची प्राइस बँड 90 रुपये ते 94 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या कंपनीने आपल्या एका लॉटमध्ये 1,200 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदायांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 112,800 रुपये जमा करावे लागतील. NII ला किमान 2 लॉट खरेदी करण्यासाठी 2,25,600 रुपये जमा करावे लागतील.

टीबीआय कॉर्न कंपनीने आपल्या IPO मध्ये 35 टक्के वाटा किरकोळ गुतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. आणि 15 टक्के वाटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. उर्वरित वाटा कंपनीने QIB साठी राखीव ठेवला आहे. टीबीआय कॉर्न कंपनीने आपल्या IPO साठी स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट आणि एकादृष्ट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. आणि Kfin Technologies Limited कंपनीला ही IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी टीबीआय कॉर्न कंपनी गुंतवणुकदारांना शेअर्सचे वाटप करेल. 7 जून रोजी या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध केले जातील. या कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. टीबीआय कॉर्न ही कंपनी मुख्यतः फॅट फ्री कॉर्न, कॉर्न फ्लेक्स, क्रॅक्ड कॉर्न, कॉर्न फ्लोअर आणि हळद यासारखे उत्पादने विकते.

ग्रे मार्केटमध्ये टीबीआय कॉर्न IPO स्टॉक 65 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 159 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ज्या गुंतवणुकदारांना IPO स्टॉक वाटप केले जातील, त्यांना पहिल्याच 70 टक्के नफा सहज मिळू शकतो. आर्थिक वर्ष 2020-21, 2021-22 आणि 2022-23 मध्ये कंपनीचा महसूल अनुक्रमे 66.96 कोटी, 100.97 कोटी आणि 140.43 कोटी नोंदवला गेला होता.

या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 71.20 कोटी रुपये कमाई केली होती. आर्थिक वर्ष 2020-21, 2021-22 आणि 2022-23 मध्ये कंपनीचा PAT अनुक्रमे 23.93 लाख, 45.16 लाख आणि 6.86 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीने 6.7 कोटी रुपये नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of  TBI Corn LTD 30 May 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(132)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x